एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठबातम्याSolapurMadha : प्रसूती झालेल्या महिलेने रुम स्वच्छ केली तर नवऱ्याने शौचालय साफ केलं; माढ्यातील सरकारी दवाखान्यातील धक्कादायक प्रकार
Madha Civil Hospital : एकीकडे खासगी रुग्णालये भरमसाठ फी घेतात तर दुसरीकडे स्वस्त समजल्या जाणाऱ्या सरकारी रुग्णालयांना कुणीही वाली राहिला नसल्याचं समोर येत आहे.
By : सुनील दिवाण, एबीपी माझा|Edited By: अभिजीत जाधव|Updated at : 10 Apr 2025 10:47 PM (IST)
Madha Civil Hospital News
Source : ABP Majha Digital
सोलापूर: एका बाजूला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पैशाची लूट झाल्याचे प्रकरण ताजे असताना इतर ठिकाणच्या सरकारी रुग्णालयांची अवस्था ही काही वेगळी नसल्याचं समोर येतंय. खाजगी रुग्णालये रुग्णांची लूट करतात. तर सरकारी रुग्णालयात स्वच्छता आणि सफाईचा अभाव असल्याचे चित्र माढा ग्रामीण रुग्णालयात समोर आले आहे. या ग्रामीण रुग्णालयात नुकत्याच प्रसूती झालेल्या महिलेवर आणि तिच्या पतीवर अस्वच्छ रुग्णालयाची खोली, शौचालय साफ करण्याची वेळ आली आहे.
रुग्णालयातील घाणीचा नवजात मुलाला त्रास होऊ नये, रोगराई होऊ नये यासाठी या दाम्पत्यांना रुग्णालयात स्वच्छतेचं काम करावं लागतं. यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था कशी कोलमडली आहे. याचे उदाहरण समोर आले आहे.
सरकारी रुग्णालयात अस्वच्छता
राज्यातील लाखो गोरगरीब रुग्ण कमी दरात उपचार मिळावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये मध्ये जाऊन उपचार घेतात. मात्र या रुग्णांना येथील वेगळ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याची वेगवेगळी उदाहरणे समोर येत आहे. माढा तालुक्यातील हेमा धडे या प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांची शस्त्रक्रिया होऊन प्रसूती झाली. मात्र त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने आपल्या नवजात मुलाला या घाणीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वतःच ती खोली साफ सफाई करण्याची वेळ आली.
चार दिवस दवाखान्यात असेपर्यंत त्यांनी ऑपरेशन झालेल्या अवस्थेत साफसफाई केली. पण रुग्णालयातील निष्ठुर कर्मचाऱ्यांना दया आली नाही. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी स्वच्छतेकडे लक्ष न दिल्याने त्यांच्या पतीने सुद्धा अस्वच्छ शौचालय साफ केले.
रुग्णालयाने जबाबदारी झटकली
माढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र प्रसूती झालेल्या महिलेला कोणीही साफ सफाई करायला सांगितले नाही असे म्हणत सरकारी भाषेत आपली जबाबदारी झटकून टाकली आहे. या हॉस्पिटलची सफाई करणारे खाजगी ठेकेदाराचे कर्मचारी येणे बंद झाल्यानंतर आता वरिष्ठांना कळविले असून दुसरी व्यवस्था करण्याच्या सूचना मिळाल्या असल्याचे येथील आरोग्य अधिकारी डॉ. विलास नेमाने यांनी सांगितले.
या प्रकाराची चौकशी सुरू असून वरिष्ठांना याबाबत माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र पाच दिवस या दवाखान्यात सफाईच होत नसल्याने नवजात शिशू आणि मातांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.
हा प्रकार समोर आणणारे शिवसेना शिंदे गटाचे शंभू साठे यांनी मात्र असे प्रकार येथे वारंवार घडत असल्याचा आरोप केला. याला जबाबदार असणारे अधिकारी डॉक्टरांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Published at : 10 Apr 2025 10:44 PM (IST)
Tags :
Solapur Madha Civil Hospital HEALTH #Marathi News Deenanath Mangeshkar Hospital
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#IPL2025#MIvsCSK#Devendra Fadnavis#Dhananjay Munde#Beed#Cricket News#Maharashtra Vidhan Sabha Session#Maharashtra Assembly Election2024#MVAvsMahayuti#Sharad Pawar#Chhatrapati Shivaji Maharaj#Maharashtra Politics#Marathi News#Mumbai News#Pune News#Uddhav Thackeray# Massajog#Santosh Deshmukh
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
BLOG: बुद्धिमान चहलमुळे पंजाब हर्षित!
Opinion